जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे प्रमुख टाळकरी, सहकारी व लेखनिक
श्री संत संताजी जगनाडे महाराज
महाराष्ट्रातील सुदुंबरे या पवित्र भूमीत जन्मलेले श्री संत संताजी जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांचे निकटवर्तीय सहकारी, प्रमुख टाळकरी आणि अभंगांचे लेखनिक म्हणून ओळखले जातात. संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचे लेखन व जतन करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ज्ञान, भक्ती, त्याग आणि समतेचा संदेश देणारे संताजी महाराज महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील एक अमूल्य व्यक्तिमत्त्व आहेत.
श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची ओळख
संतांचे कार्य मानवजातीच्या कल्याणासाठी असते. श्री संत संताजी महाराज हे एक महान संत होऊन गेले समाज सुधारणेचे काम ही त्यांनी केले हे सर्व आपणास माहितच आहे.
जन्म व बालपण
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. वडील विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे श्री संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले.
तेल्याचे घर असल्यामुळे मुलांना हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे श्री संताजी महाराजांनी देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे श्री संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही. श्री संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. त्यांना कीर्तनाला भजनाला जाण्याची आवड लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चवदा टाळकऱ्या पैकी एक झाले.
गुरुभेट, गाथा रक्षण व अलौकिक समाधी प्रसंग
त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनांच्या आणि अभंगांच्या माध्यमातून प्रभोधन देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा श्री संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा श्री तुकाराम महाराज श्री संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून श्री संताजींवर तुकाराम महाराजांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा संत श्री तुकारामांनी श्री संताजीना समजावून सांगितले, की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. आणि तेव्हापासून श्री संताजी जगनाडे महाराज (संतू तेली ) हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले.
संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी संत तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली. शेवटच्या क्षणी समाधीवर माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारामांनी श्री संताजीना दिले होते. परंतु तुकाराम महाराज हे श्री संताजी जगनाड्यांच्या अगोदरच वैकुंठाला गेले.
असे म्हणतात की, जेव्हा श्री संताजीचे देहावसान झाले तेव्हा अंत्य संस्काराच्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी काही श्री संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते,त्यांचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी तीन मुठी माती टाकल्यानंतर श्री संताजींचा पूर्ण देह झाकला गेला.
श्री संत संताजी महाराज तीर्थक्षेत्र सुदुंबरे
समाधी मंदिर व पवित्र परिसर दर्शन
श्री संत संताजी महाराज समाधी, सुदुंबरे
श्री संत संताजी महाराज, मंदिर
श्री संत संताजी महाराज समाधी सुदुंबरे परिसर
श्री संत संताजी जगनाडे महाराज व्हिडिओ
व्हिडिओ
श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचे चरित्र
VIDEO CREADIT YT :- Shrikrushna Maharaj Shirsolikar
श्री संत संताजी जगनाडे महाराज प्रतिमा अनावरण सोहळा
VIDEO CREADIT YT :- Teli Samaj Social Media Official
संत जगनाडे महाराज जीवनगाथा – भाग १
VIDEO CREADIT YT :- Sunil Chaudhari
बँक देणगी तपशील (Bank Account for Donation)
श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळ, पंढरपूर
देणगीदार बंधू-भगिनींना आपली देणगी चेक / ऑनलाईन / बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत पाठवावी.